‘बिग बॉस ११’ मध्ये पूजाची ‘ढिंच्याक’ एन्ट्री !

22
सामना ऑनलाईन । लोणावळा
वयाच्या २२व्या वर्षी ढिंच्याक पूजा सोशल मीडीयावरुन प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या संगीताचे ज्ञान नसतानाही, ‘सेल्फी मैने ले ली’ हे गाणे आज अतिशय कमी वेळात प्रसिद्ध झाले आहे. या गाण्याला जवळजवळ १३० लाख लोकांनी बघितले आहे.
जगात फार कमी लोक आहेत की, ज्यांच्यावर टीका होऊनही ते कायम प्रसिद्धीत राहतात. त्यापैकीच एक नाव म्हणून ढिंच्याक पूजाला ओळखले जाते. आता पुन्हा एकदा पूजाची अशीच ढिंच्याक एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे.
ढिंच्याक पूजा ‘बिग बॉस ११’मध्ये ‘बिग बॉस’च्या घरात येणार आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या हंगामात घरात येणार असलेल्या सर्व उमेदवारांपैकी पूजा ही सर्वाधिक मानधन घेणारी व्यक्ती असल्याचे समजते. तिने सर्व करारांची पूर्तता करुन घरात प्रवेश करण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.
अतरंगी गाणी आणि त्याचे भन्नाट व्हिडिओ यामुळे पूजाचे ढिंच्याक रुप लोकांसमोर आले. याच व्हिडिओवर पूजाने कोट्यवधी रुपयांची कमाईही केली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधी पूजा अजूनही काही ढिंच्याक गाणी तयार करणार असल्याचं बोललं जातंय. पूजा बिग बॉसच्या घरातही आपली गाणी ऐकवणार यात काही शंका नाही. मात्र ही ढिंच्याक गाणी बिग बॉसच्या नव्या पर्वाचे सदस्य झेलू शकतील की नाही हेच आता बघायचे आहे.
आपली प्रतिक्रिया द्या