झणझणीत धिरडं

43

साहित्य : एक वाटी बारीक रवा, एक वाटी तांदळाची पिठी, अर्धी वाटी बेसन, एक वाटी बारीक चिरलेला अथवा किसलेला कांदा, दोन बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या, एक चमचा आल्याची पेस्ट, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, एक चमचा जिरं, ओवा, चवीनुसार मीठ, तेल.

कृती : धिरडी बनवताना सर्वप्रथम एका भांडय़ात तेल वगळता वरील सर्व पदार्थ घेऊन त्यात तिखट मीठ हळद घालायचे. त्यात २ चमचे कच्चे तेल घालाके. त्यानंतर ओवा, जिरे पूड आणि ठेचलेला लसूण आणि पाणी घालून चांगले सरमरीत भिजवावे. नंतर भज्यांच्या पिठासारखे पीठ करून घ्यायचे. मग गॅसवर तवा ठेऊन डोसा करतो तसे आकार करून नॉनस्टिक तव्यावर फुलक्याच्या आकाराची जरा जाडसर धिरडी घालावीत.

आपली प्रतिक्रिया द्या