ढोकळे खाणाऱ्यांनो आमच्यापासून लांबच राहा, म्हणणाऱ्या महिलेला नेटकऱ्यांनी झोडपले

839

हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन अर्थतज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्रातील ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रात ‘नोबेल’ मिळविणारे बॅनर्जी हे दुसरे हिंदुस्थानी वंशाचे नागरिक ठरले आहेत. त्यामुळे तमाम हिंदुस्थानी नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, याच घटनेचा संदर्भ देत प्रांतवादी टीका करणाऱ्या महिलेला नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे.

अपर्णा असं या महिलेचं नाव असून तिने ट्विटरवर केलेल्या एका ट्वीटमुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. ”प्रिय ढोकळा खाणाऱ्यांनो, आम्ही तुम्हाला सहा नोबेल, 1 ऑस्कर जीवनगौरव, राष्ट्रगीत, वंदे मातरम दिलं आहे. आम्ही मासे, मटण, गोमांस आणि डुकराचं मांस खातो. तुम्ही तुमचे ढोकळे, खांडवी आणि ठेपले आमच्यापासून लांब ठेवा, गेट आऊट” असं प्रांतवादी ट्वीट केलं आहे. त्यावर संतापलेल्या नेटकऱ्यांनी अपर्णा यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पटेल नावाच्या ढोकळा खाणाऱ्यानेच तुम्हाला सार्वभौम राष्ट्र दिलं आहे, ज्याचं राष्ट्रगीत तुम्ही गाऊ शकता, असं एका नेटकऱ्याने ट्वीट केलं आहे. तर श्वेता नावाच्या एका नेटकरी महिलेने सहा नोबेल बंगालमध्ये विकास आणू शकले नाहीत आणि ढोकळेखाऊ लोकांनी मात्र ते राहतात ते ठिकाण चांगलं बनवलं. 1 धीरुभाई म्हणजे 60 नोबेल होतात. विक्रम साराभाई हेही ढोकळा खाणारे होते, अशा शब्दात तिला ट्रोल केलं आहे. तर काहींनी तुमच्या चलनी नोटांवरही ढोकळाखाऊ माणसाचाच फोटो असल्याचं एक नेटकऱ्याने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या