धोनीसारखे महान खेळाडू नेहमीच आदरणीय असतात- सुरेश रैना

11

सामना ऑनलाईन । कोलकाता

महेंद्रसिंग धोनीसारखे महान क्रिकेटपटू नेहमीच आदरणीय असतात. धोनीने टीम इंडियासाठी आणि आयपीएलमधील त्याच्या संघासाठी फार मोठे योगदान दिले आहे. एखाद्या हंगामातील अपयशासाठी धोनीला कर्णधारपदावरून दूर करणे आणि त्याच्या क्षमतेबद्दल शंका घेणे योग्य वाटत नाहीय अशा शब्दांत धोनीचा आयपीएलमधील माजी संघ सहकारी व गुजरात लायनचा कर्णधार सुरेश रैना याने महेंद्रसिंग धोनीची खंबीर पाठराखण केली आहे.

देशाच्या संघाला व आपल्या आयपीएल संघाला कर्णधार धोनीने आपल्या कामगिरीने यशोशिखरावर नेले आहे. त्यामुळे आता त्याचा पडता काळ आला म्हणून ऊठसूट त्याच्या क्षमतेवर टीका होतेय याचेच मला दुःख होतेय असे सांगून रैना म्हणाला, टीम इंडिया व चेन्नई सुपरकिंगला जे यश मिळाले होते त्यात धोनीचा सिंहाचा वाटा होता हे विसरून चालणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या