धोनीमुळेच मी अनेकदा वाचलो-विराट कोहली

39

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

विराट कोहलीने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीचा प्रारंभ केला. तेव्हापासून आजपर्यंत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालीच मी ‘टीम इंडिया’त खेळलो. धोनी केवळ माझा कर्णधारच नव्हता तर संरक्षकही होता. त्याच्यामुळेच अनेकदा माझी संघातील गच्छंती टळली असा खुलासा ‘टीम इंडिया’चा नवा कर्णधार विराट कोहलीने केला.

कोहली म्हणाला, धोनीच्या नेतृत्वामध्येच माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात मी सातत्यपूर्ण कामगिरीत अपयशी ठरत होतो. मात्र अशा परिस्थितीतही धोनीने माझ्यावर विश्वास टाकला. माझ्या संघातील स्थानाच्या सुरक्षेची हमी दिली. त्यामुळेच मी दबावाशिवाय माझा नैसर्गिक खेळ करू शकलो. धोनीने वेळोवेळी मार्गदर्शन केले, अनेकदा संधी दिली. त्याच्यामुळे अनेकदा माझी संघातील गच्छंती टळली. त्यामुळेच माझी कारकीर्द नावारूपाला आली. एक कर्णधार म्हणून धोनीची जागा भरून काढणे ही सोपी गोष्ट नाही, अशी प्रांजळ कबुलीही कोहलीने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या