…म्हणून अंतिम सामन्यात पोहचूनही धोनी आहे नाराज

50

सामना ऑनलाईन । मुंबई

आयपीएल- २०१८ चा अंतिम सामना आज (रविवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन वर्षांनी पुनरागमन करणारी चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या टॉपच्या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज स्पर्धेत चांगली करेल की नाही याबाबत तज्ज्ञांकडून शंका उपस्थित केली जात होती. मात्र, सर्व शंकांना बाजुला सारत चेन्नईने आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मात्र तरीही चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला एका गोष्टीचं दु:ख आहे.

चेन्नईचं होम ग्राऊंड असलेल्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सामने खेळू न शकल्यामुळे धोनी नाराज आहे. गेल्या महिन्यात कावेरी पाणी प्रश्नामुळे चेन्नईमध्ये तणावपूर्व परिस्थिती होती. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईचे सर्व सामने पुण्यात हलवण्यात आले होते. चेन्नईने आयपीएल २०१८मध्ये केवळ एक सामना एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला.

अंतिम सामन्याआधी धोनी म्हणाला की, ‘एकही सामना आमच्या घरच्या मैदानावर खेळू शकलो नाही म्हणून आम्ही निराश होतो. या गोष्टीचं दुख असलं तरी खेळाडू वृत्तीने याबाबत आम्ही विचार करतोय. मात्र आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही एक सामना तरी घरच्या मैदानावर खेळू शकलो. आम्ही दोन वर्ष आयपीएलमध्ये नव्हतो, मात्र सीएसकेच्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या