धोनीचे विनामानधन टीम इंडियाला मार्गदर्शन, मेण्टॉरपदासाठी ‘फी’ घेणार नाही

आपल्या नेतृत्वात हिंदुस्थानला वन डे वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप व आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी यूएईत खेळवण्यात येणार्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मेण्टॉर असणार आहे. पण या पदावर कार्यरत राहताना तो कोणतीही फी घेणार नाही. याचाच अर्थ तो विनामानधन हिंदुस्थानी खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे, असा खुलासा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याकडून मंगळवारी करण्यात आला.

आवेश खानकडे नेट बॉलरची जबाबदारी

आवेश खान याने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी मोलाची कामगिरी बजावली. आता हिंदुस्थानचा हा युवा गोलंदाज टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी नेट बॉलरची भूमिका बजावणार आहे. तसेच त्याच्यासोबत जम्मू-कश्मीरचा उमरान मलिक याचीही नेट बॉलर म्हणून निवड करण्यात आली आहे. दोघांनाही आयपीएल संपल्यानंतर यूएईमध्येच रहावे लागणार आहे.

हार्दिक फलंदाज, व्यंकटेश बेंचवर बसणार

बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले की, हार्दिक पांडय़ाला फक्त फलंदाज म्हणून टीम इंडियात स्थान देण्यात येणार आहे. याचा अर्थ तो टी-20 वर्ल्ड कपमध्येही गोलंदाजी करणार नाही. तसेच कोलकाता नाइट रायडर्ससाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱया व्यंकटेश अय्यर याची पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात येण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या