धुळे : ट्रक-सुमोच्या अपघातात ५ ठार, ५ जखमी

32

सामना ऑनलाईन । धुळे

धुळे येथील मुटकी येथे ट्रक आणि सुमो गाडीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत. अपघातात सुमो गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी सूरत-नागपूर हायवेवर रास्तारोको केला.

अपघाताला हायवेवरील खड्डे कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे हायवेवरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी हायवेवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे हायवेवरील वाहतूक खोळंबली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत.

आपली प्रतिक्रिया द्या