यंदापासून ‘डायमंड ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई’ पुरस्कार

249

मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी जगभरात आपला नावलौकीक केला. त्यांच्या कर्तृत्वाची सर्वांना ओळख पटवून देण्यासाठी यंदापासून विद्यापीठामार्फत ‘डायमंड ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई’ हे पुरस्कार दिले जाणार आहेत. विद्यापीठातर्फे आयोजित होणार्‍या विशेष कार्यक्रमात या वर्षी तीन माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांचा समृद्ध राष्ट्राच्या उभारणीत मोठा वाटा आहे. ‘भारतरत्न’ पुरस्कारानेही या विद्यापाठातील पाच माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री, पद्मविभूषण अशा विविध पुरस्कारांनी या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, ‘डायमंड ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई’ पुरस्कार देऊन अशा विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या