Photo – ब्रायडल लूकमध्ये डायना पेंटीचा किलर लूक, फोटोंनी वेधले लक्ष

अभिनेत्री डायना पेंटी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 2005 साली मॉडेलच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली. तर अभिनय क्षेत्रात डायनाने 2012 ला ‘कॉकटेल’ सिनेमातून पदार्पण केले. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. ती आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच डायनाने ट्रेडिशनल लूकमध्ये आपले काही फोटो शेअर केले असून चाहत्यांकडून तिच्या फोटोंचे कौतुक होत आहे.

अभिनेत्री डायना पेंटी नुकतेच ब्रायडल फॅशन शोची शोस्टॉपर बनली होती आणि त्या दरम्यान रॅंपवर ती चमकली .डायना ब्रायडल लूकमध्ये कमालीचे सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये डायना पेंटी ट्रेडिशनल लूकसोबत कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या फोटोंवर युजर्सनी जबरदस्त कॉमेण्ट केल्या आहेत.

या फोटोंमध्ये डायनाने मोती रंगाचा लेहेंगा- डीपनेक ब्लाऊज घातला असून त्यावर मिरर वर्क केलेले आहे.

लेहेंग्यामध्ये डायना एकापेक्षा एक भन्नाट पोज देताना दिसत आहे.

चेहऱ्यावर स्मोकी मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत.

डायनाचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून तिच्या फोटोंवरुन नजरा हटेनाशा झाल्या आहेत.