डाएटवर राहायचे असेलतर अशी असावी दिनचर्या!

210

dr-namrata-bharambe>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे

गेल्या आठवड्यात आपण डाएट म्हणजे नेमकं काय आणि ते का खावं याची माहिती घेतली. आज आपण योग्य प्रकारे डाएट कसे करावे त्याच्या टीप्स जाणून घेऊया.

१) सकाळी उठल्यावर एक तासाच्या आत Break-Fast करा. लक्षात घ्या की रात्रभर उपाशी असलेल्या शरीराला कार्यरत होण्यासाठी आवश्यक इंधन हे ब्रेकफास्टमधून मिळत असते.

२) दिवसभरात १२-१५ ग्लास पाणी प्या. अतिथंड पाणी कोणत्याही ऋतूमध्ये टाळा.

३) दिवसातून किमान १ फळ खा. मात्र फळांचे सेवन जेवणानंतर लगेच करू नका आणि दूध व फळे एकत्र घेऊ नका.

४) तेलाचा उपयोग प्रतिव्यक्ती प्रतिदिन १०-१५ ग्रॅम पेक्षा जास्त नसावा.

५) शरीरासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरणे फायदेशीर असते. म्हणून शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, करडई तेल, खोबरेल तेल, जवस तेल इ. तेल आलटून-पालटून वापरा.

६) आपल्या आहारात आपल्या जवळ पिकणाऱ्या भाज्य व फळांचा समावेश करा.

७) केमिकल पेस्टीसाईड/ फर्टीलायझर वापरलेले अन्नपदार्थ टाळा.

८) प्रत्येक जेवणात २-३ तासांचे अंतर ठेवा. म्हणून रोज किमान ५ वेळा खा. (small portions and frequent meals)

९) सॅलड (काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, लेट्यूस, ब्रोकोली इ.) तुमच्या दुपारच्या व रात्रीच्या जेवणाचा अविभाज्य भाग असला पाहिजे.

१०) रात्रीचे जेवण हलके आणि २ घास कमी घ्यावे व जेवण घेतल्यानंतर किमान दीड तासांनंतर झोपा.

११) ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी या धान्यांचा व कडधान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.

१२) धान्य, डाळी हे चकचकीत पॉलिश केलेले घेण्यापेक्षा पॉलिश न केलेले अन्नधान्यांना प्राधान्य द्या. (जसे हातसडीचा तांदूळ)

१३) रोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाणी प्या.

१४) डाएट हे शारीरिक व्यायामाशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच रोज किमान ३०-४० मिनिटे व्यायाम करा. जसे चालणे, धावणे, पोहोणे, मैदानी खेळ योगासने वा सूर्यनमस्कार इ.

१५) ध्यानाची जोड आपल्या जीवनशैलीला द्या. रोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना ५ ते १० मिनिटे ध्यान करा. त्यामुळे अतिरिक्त मानसिक व शारीरिक ताण दूर राहतो. तसेच ताणामुळे होणारे आजार कमी होतात.

आपल्याला वरील माहिती कशी वाटली जरूर कळवा. Email: [email protected]

फोन क्रमांक: ९८२०२१५७९६

आपली प्रतिक्रिया द्या