सिद्धार्थ-रसिकाचं डाएट लग्न

अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज मंडळी डाएट लग्न म्हणजे नेमपं काय? लग्नानंतरचं डाएट की, लग्नाआधीचं डाएट, असं म्हणताना दिसत होती. त्यामुळे ही नेमकी काय भानगड आहे? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर या सस्पेन्सवरून पडदा हटला आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके याने सोशल मीडियावर डाएट लग्न या आपल्या नव्या नाटकाचे पोस्टर शेअर केले आहे. यात सिद्धार्थसोबत रसिका सुनील मुख्य भूमिकेत असणार आहे. सविता सूर्यवंशी आणि आदित्य सूर्यवंशी निर्मित या नाटकाचे दिग्दर्शन विजय पेंकरे यांनी केले आहे, तर मनस्विनी लता रवींद्र लेखिका आहेत. चंद्रलेखा फाऊंडेशन निर्मित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 9 जून रोजी शिवाजी मंदिर नाटय़गृहात होणार आहे.