लोकांचा भर डिजिटल व्यवहारावर, एका वर्षात 51 टक्क्यांनी वाढ

83

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

डिजिटल व्यवहार ही काळाची गरज आहे. त्यानुसार लोकांनीही या डिजिटल व्यवहाराला चांगलीच पसंती दर्शवली आहे. 2018-19 या वर्षात डिजिटल व्यवहारात तब्बल 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. लोकसभेत सरकारने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत 3 हजार 133 कोटींचा व्यवहार हा डिजिटल माध्यमातून झाल्याचे सरकारने म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 एप्रिल 2019 पर्यंत 313 कोटींचा व्यवहार हा डिजिटल माध्यमातून झाला आहे. तसेच या व्यवहारामध्ये कुठलीच अडाण नसून दिवसें दिवस या व्यवहारात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच डिजिटल व्यवहार वाढण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत 2018-19 मध्ये डिजिटल व्यवहारात 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतपर्यंत3 हजार 133 कोटींचा व्यवहार डिजिटल माध्यमातून झाला आहे. तसेच 2017-18 मध्ये हा  2 हजार 70 कोटींचा व्यवहार हा डिजिटल माध्यमातून झाला होता.

ऑनलाईन व्यवहारासांठी केंद्र सरकारने भीम ऍपची निर्मिती केली होती. एप्रिल 2017 पर्यंत 31 लाख रुपयांचा व्यवहार भीम ऍपमधून झलाअ होता तर 2019 मध्ये यात वाढ होऊन तब्बल दीड कोटींहून अधिक व्यवहार भीम ऍपच्या माध्यमातून झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या