कोलकाता नाईट रायडर्सची धुरा दिनेश कार्तिकच्या खांद्यावर

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयपीएलच्या ११व्या सीजनमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या लिलावामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंच्या संघामध्ये अदला-बदली झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा यशस्वी कर्णधार गौतम गंभीरचाही दिल्लीच्या संघात समावेश झाला आहे. गंभीरनंतर कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी आता फलंदाज-यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याच्याकडे सोपवण्यात आली आहे.

दिनेश कार्तिक कोलकाता संघाचं नेतृत्व करणार असल्याची घोषणा कोलकाता नाइट रायडर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केली आहे. कार्तिक याआधी गुजरात लायन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांसाठी खेळला आहे. यावर्षीच्या लिलावात कोलकातानं त्याला ७.४ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाता संघ किती यशस्वी होतो याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या