पोर्तुगालच्या समुद्र किनाऱ्यावर सापडला ३०० दातांचा फ्रिल्ड शार्क

115

सामना ऑनलाईन। लिस्बन

पोर्तृगालच्या समुद्र किनाऱ्यावर फ्रिल्ड शार्क नावाचा सहा फूट लांबीचा अजब दुर्मिळ मासा सापडला आहे. हा मासा डायनासोरच्या काळातील असल्याच बोललं जात आहे. या माशाला ३०० दात आहेत. या माशाच्या दातांची ठेवण डायनासोर सारखीच आहे. यामुळे ८ करोड वर्षापूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या डायनासोरच्याच प्रजातीतील हा मासा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे.
काही दिवसांपूर्वी युरोपिय युनियनच्या वैज्ञानिकांची एक टीम अटलांटीक महासागरातले जलचर पकडण्यासाठी गेली होती. त्यावेळी जाळ्यात हा फ्रिल्ड शार्क मासा त्यांना सापडला. समुद्री सापाप्रमाणे हा देखील दुर्मिळ मासा आहे. १९ व्या शतकात काही मच्छिमारांनी फ्रिल्ड शार्क बघितल्याचा दावा केला होता. त्यांनी त्या माशाच्या केलेल्या वर्णनावरून हा देखील त्याच प्रजातितला मासा असल्याचे निष्पन्न झाले आहे. फ्रिल्ड शार्क जपान,न्यूजीलँड आणि ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात आढळतात. ८ करोड वर्षापासून पृथ्वीवर जगणाऱ्या या जलचराचा सामना आतापर्यत मनुष्याशी अपवादात्मक परिस्थितीतच झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या