विदर्भात सापडले डायनासोरचे जीवाश्म

115

सामना ऑनलाईन । गडचिरोली

सिरोंचा येथील जंगलात ३१ जानेवारीला हिंदुस्थान आणि अमेरिकेतील जीवाश्म वैज्ञानिकांनी तपासणी केली. या तपासणीत वैज्ञानिकांना ज्युरासीक काळातील डायनासोर,मत्स्य, वृक्षांचे अवशेष सापडले आहेत.

सिरोंचामध्ये सापडलेले जीवाश्म हे कोटा फॉर्मेशनचे असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले असून सापडलेले अवशेष पायाचे बोट, मनगट, गळ्याचा भाग इत्यादींचे असल्याचे मत अमेरिकेतील वैज्ञानिकांनी व्यक्त केले असून त्यांचे वय १५० ते १६० दशलक्ष वर्षे असू शकते असेही सांगितले आहे. सापडलेल्या जीवश्म आणि अवशेषांचे नमुने हे अधिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तसेच सिरोंचा येथील जंगलात २०१५ सालीसुद्धा वैज्ञानिकांच्या मदतीने डायनासोर, मत्स्य व झाडांचे अवशेष जमा करण्यात आले होते. त्यानंतर वडधम येथे फॉसील पार्क तयार करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन व्हावे म्हणून २०१८मध्ये अमेरिकेतल्या नावाजलेल्या जीवाश्म संशोधकांना हिंदुस्थानी संशोधकांच्या मार्फत कोटा फॉर्मेशन मधील जिवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी बोलाविण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन व्हावे म्हणून २०१८मध्ये अमेरिकेतल्या नावाजलेल्या जीवाश्म संशोधकांना हिंदुस्थानी संशोधकांच्या मार्फत कोटा फॉर्मेशनमधील जीवाश्मांच्या अभ्यास करण्यासाठी बोलाविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन व्हावे म्हणून २०१८मध्ये अमेरिकेतल्या नावाजलेल्या जीवाश्म संशोधकांना हिंदुस्थानी संशोधकांमार्फत कोटा फॉर्मेशनमधील जीवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी बोलाविण्यात आले. एकाच जागेवर वनस्पती, प्राणी आणि मासे यांचे जीवाश्म हिंदुस्थानमध्ये फक्त सिरोंचा येथेच दिसून येतात. सिरोंचा वनाविभागामार्फत आंतरराष्ट्रीय फॉसील पार्क बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या