त्याच्या कुंचल्याने निर्जीव इमारती सजीव होतात!

91

दीपक आहेर… एक अफलातून चित्रकार. मुंबईतील ऐतिहासिक इमारतींचे सौंदर्य तो चित्राद्वारे दाखवतो.

इमारती आपण नेहमी पाहातो… पण या निर्जिव इमारतींमध्येही चित्रकार दीपक आहेर कला शोधतो. मनातल्या इमारती कॅनव्हासवर उतरवल्याशिवाय मग त्याला स्वस्थ बसवत नाही. मुंबईतील ऐतिहासिक व संस्कृतीदर्शक इमारतींचे व वास्तूंचे त्याने प्रकाशमान दृष्यपरिणामातून सादरीकरण केले आहे. छत्रपती शिकाजी महाराज रेल्वे स्थानक, महापालिका बिल्डिंग, राजाबाई टॉवर अशा प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वास्तूंचे प्रकाशमान घडवताना त्याने आपल्या चित्रांमधून तो सांस्कृतिक वारसा व वैभव जतन करण्याचा क पुढील पिढय़ांपर्यंत तो पोहचविण्याचा कलात्मक संदेश दिला आहे. लहानपणापासूनच दीपकला चित्र काढायचं वेड होतं. मग तो शाळेतल्या वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. त्यात त्याला अनेक बक्षिसेही मिळाली. यामुळेच मग दहावी-बारावी पूर्ण केल्यानंतर त्याने जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे अभ्यासक्रम पूर्ण केला. हातातील कलेचा व्यावसायिक उपयोग त्याला करता आला असता, पण तो म्हणतो, उपजीविकेसाठी नाही, तर आवड म्हणून मी या कलेकडे पाहतो. या क्षेत्रात मला बरेच चित्रकार आवडतात. पण त्यातल्या कुणाला आदर्श मानत नाही. कारण एखाद्याला आदर्श मानले तर आपण त्याची कॉपी करायला लागतो.

आपली प्रतिक्रिया द्या