नांदेड जिल्ह्यातील दहा जणांना पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह

सविता केळगंद्रे व विलास शिंदे

सामना प्रतिनिधी । नांदेड

राज्याच्या पोलीस महासंचालकांनी पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यातील आठशे पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकाचे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र जाहीर केले आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील दहा जणांचा समावेश आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक सु. कु. जयस्वाल यांनी पोलीस दलात उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यातील आठशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर केले आहे. येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या संचलनाच्यावेळी हे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. यात नांदेड जिल्ह्यातील दहा जणांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे. विलास सुभाषराव शिंदे-पोलीस नायक, राज्य गुप्त व अर्थ विभाग, सविता मनोहर केळगंद्रे-नागरी हक्क संरक्षण विभाग, सतीश दत्तात्रय मुधोळकर, संजय विठ्ठलराव राखेवार-पोलीस हवालदार, गुन्हे अन्वेषण विभाग, नईम खान मैनोद्दीन खान-पोलीस हवालदार, काझी मोहंमद आदिलोद्दीन-पोलीस हवालदार, दहशतवाद विरोधी पथक, महंमद तैयब महंमद अब्बास-पोलीस हवालदार, दहशतवाद विरोधी पथक, नथ्थू गंगाराम भोसले- पोलीस हवालदार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मिर्झा इब्राहीम बेग मिर्झा चाँद बेग- पोलीस हवालदार नांदेड, चाँदखान जब्बार खान-चालक, सहायक पोलीस निरीक्षक.