Video – तुझ्या शरीरावर थुंकणार पण नाही, लाईव्ह शोमध्ये दिग्दर्शकाची महिलेवर अश्लील टिपण्णी

एका लाईव्ह टिव्ही शोमध्ये पाकिस्तानचे दिग्दर्शक व लेखक खलील उर रेहमान यांनी एका महिलेला शिवीगाळ करत तिच्यावर अश्लील टिपण्णी केली आहे. त्याच्या या असभ्य वर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे.

पाकिस्तानात सध्या अनेक महिला एकत्र येऊन त्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत. या महिला मोर्चे काढत असून त्यात ‘मेरा जिस्म मेरी मर्जी’ अशी त्यांची टॅगलाईन आहे. या आंदोलनावरून एका पाकिस्तानी न्यूज चॅनलवर संवाद आयोजित करण्यात आला होता.त्यात या आंदोलनाच्या प्रमुख मारवी सिरमत फोनलाईनवरून उपस्थित होत्या. तसेच दिग्दर्शक खलीलल उर रेहमान देखील उपस्थित होत. त्यावर बोलत असताना या दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर खलीलने भर लाईव्ह कार्यक्रमात मारवी यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर अश्लील टिपण्णी केली. ‘तुझं शरीर आहे तरी काय? तुझ्या सारख्या महिलेच्या शरीरावर कुणी मर्द थुंकणार पण नाही’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या