प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक

1689

‘लई भारी’, ‘दृश्यम’, ‘मुंबई मेरी जान’ असे अनेक सुपरहिट चित्रपट मराठीसह बॉलीवूडला देणारे आघाडीचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक आहे. लिव्हर सिरॉसिस अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे उपचारासाठी त्यांना हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. निशिकांत कामत यांनी दिग्दर्शनासह अभिनयात देखील आपली छाप पाडली आहे. ‘रॉकी हँडसम’, ‘फुगे’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’ अशा काही हिंदी – मराठी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आहे. त्यांचा आगामी चित्रपट ’दरबदर’ असून तो 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या