आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्समध्ये करमज्योतीला कांस्य

24

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडची राजधानी लंडन येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत हिंदुस्थानच्या करमज्योती दलालने कांस्य पदक पटकावले. थाळीफेक प्रकारात करमज्योतीने १९.०२ मीटर लांब थाळी फेकली. याआधी लंडन पॅरा अॅथलेटीक्स स्पर्धेत हिंदुस्थानच्या सुंदरसिंह गुर्जरने सुवर्ण पदक जिंकले. त्याने भालाफेक प्रकारात ६०.३६ मीटर लांब भाला फेकला. तर अमित सरोहाने क्लब थ्रो प्रकारात रौप्य पदक मिळवले. हिंदुस्थानने आतापर्यंत लंडन पॅरा अॅथलेटीक्स स्पर्धेत १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशी ३ पदके जिंकली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या