बेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे मत

661

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत रविवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पाडली. या अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले. तसेच या अधिवेशनात बेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे असे मत मोदी यांनी व्यक्त केले.


या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांच्या स्थानबद्धतेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच त्यांना या अधिवेशनात भाग घेण्यास परवानगी मिळावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. या बैठकीत 27 पक्षाच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला.

लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की या अधिवेशनात आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या