‘दिशा’ कायद्यासाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवणार – अनिल देशमुख

496
anil-deshmukh-new

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून आंध्र प्रदेशच्या धर्तीवर “दिशा” कायदा आणणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे केली.

हा कायदा करताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विचारमंथन होणे गरजेचे आहे. यासाठी अध्यादेश न आणता दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे व त्यापूर्वी बैठक घेऊन महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या सूचना जाणून घेतल्या जातील अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.

आज महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांवर चाप लावण्याच्या दृष्टीने तसेच महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासंदर्भातला ‘दिशा’ कायदा याच अधिवेशनात आणण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच स्थगित करावे लागत असल्यामुळे या कायद्याचे विधेयक या अधिवेशनात मांडणे शक्य नाही असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या