प्रियंका रेड्डी प्रकरणाचा नगर जिल्ह्याच्या पशुवैद्यकीय संघटनेकडून निषेध

448

तेलंगणा राज्यातील पशुवैद्यक डॉ. प्रियंका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा देशभरातून निषेध होत आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना शाखा नगरच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन सादर करण्यात आले. या अमानुष घटनेची चौकशी जलदगती न्यायालयात व्हावी. दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. रेड्डी कुटूंबियाच्या दु:खात व वेदनेत जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यक सहभागी आहेत. अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंबारे , सहाय्यक आयुक्त डॉ. दिलीप खपके, डॉ. जालिंदर टिटमे, डॉ. प्रज्ञा ओहोळ, डॉ. विजय कवडे, डॉ. वर्षा साबळे, डॉ.सोपान नांदे, डॉ. मुकुंद राजळे, डॉ. राजेंद्र शेटे, डॉ. सुनिल सानप, डॉ. शैलेश बन, डॉ. अनिल गडाख, डॉ. बाजीराव अटक, डॉ. रविंद्र वसमतकर, डॉ. संजय थोरात, डॉ. नितिन पवार, डॉ. अनिल कराळे, डॉ. दिनेश पंडुरे, डॉ. राजेंद्र जाधव , डॉ. वसंत गारुडकर , डॉ. ज्ञानेश्वर काळे , डॉ. भाऊसाहेब डौले, डॉ. विजय धिमते यांच्यासह इतर पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या