व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगचा आधार घेत घटस्फोट

38


सामना ऑनलाईन | पंढरपूर

आज पर्यंत तुम्ही व्हॉट्सअपवरून तलाक दिल्याची बातमी वाचली असेल मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात न्यायालयांनीही स्‍मार्ट उपकरणांच्या माध्यमातून निकाल देण्यास सुरूवात केली आहे. असाच एक स्‍मार्ट निर्णय एका जोडप्याच्या घटोस्‍फोटाच्या प्रकरणात न्यायालयाने दिला आहे. व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलिंगचा आधार घेत, जर्मनीत असलेल्या पतीशी संपर्क साधून बारामतीच्या न्यायालयाने घटस्फोटाचा निकाल दिला. बारामती न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. त्यामाध्यमातून एका उच्चशिक्षित जोडप्याच्या घटस्फोटाबाबतचा निर्णय घेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या