सोशल साईटवर डिवोर्स सेल्फीची धूम

15

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

डिवोर्स म्हणजे एका सुंदर नात्याचा दुख:द शेवट. पण या दुखाच भांडवल न करता डिवोर्सची प्रक्रिया सुरू झाली त्या दिवशी व डिवोर्स झाला त्या दिवशी जोडीदारासोबत सेल्फी काढायचा व सोशल साईटवर टाकायच फॅड सध्या पाश्चिमात्य देशात वाढतयं. काहीजणं तर हे सेल्फी अविस्मरणिय दिसावेत यासाठी चेहऱ्यावर सर्जरी करत असल्याचे वृत्त आहे.

डिवोर्स प्रक्रिये दरम्यान पती व पत्नीला प्रचंड मानसिक तणावातून जावं लागतं. ज्याच्या सोबत अख्खं आयुष्य काढण्याची स्वप्ने बघितली होती त्या जोडीदारापासून कायमच विभक्त व्हाव लागणार. मग उर्वरित आयुष्य एकट्याने कसं काढायच या विचाराने अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात. तर काहीजण खुपच निराश होतात. त्यांचा जगण्यातला आनंदच निघून जातो. पण या सगळ्याला बाजूला ठेवत आगळ्यावेगळ्या पध्दतीने जोडीदाराचा निरोप घेण्याच फॅड सध्या पाश्चिमात्य देशात जोर धरु लागलय. काही जण जोडीदारासोबत सेल्फी काढून त्याला भावनिक नाव देऊन हे नातं संपल्याच सोशल साईटवर जाहीर करत आहेत. तर अनेकजण या क्षणांचा व्हिडिओ टाकून स्वतंत्र झाल्याच आनंदाने सांगत आहे. काहीजण तर डिवोर्सची कागदपत्रच स्कॅन करुन सोशल साईटवर पोस्ट करत आहेत. यातील अनेक जोडपी दुसऱ्यांना आनंदी राहण्याच्या शुभेच्छा व टीप्सही देताना दिसत आहेत. जोडीदारासोबतचा शेवटचा सेल्फी हटके दिसावा यासाठी काही महिलांनी चेहऱ्यावर सर्जरी केल्या आहेत.
दक्षिण आशियात हे फॅड पसरत आहे. आयुष्यातील अप्रिय गोष्टींना आनंदाने निरोप देण्याची ही नवीन स्टाईल असल्याच तज्ञांच म्हणंणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या