निवड रद्द झालेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना अतिरिक्त पदावर नियुक्ती

358

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आधी निवड करण्यात आलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (गट क) पदावरील 118 उमेदवारांना परिवहन विभागाने मोठा दिलासा दिला आहे. या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (गट क) पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. 31 मार्च 2018 रोजी लोकसेवा आयोगाने या पदाकरिता 832 उमेदवारांची सरकारला शिफारस केली. तथापि दरम्यानच्या काळात सामान्य प्रशासन विभागाच्या 19 डिसेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी आणि समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने 8 ऑगस्ट 2019 रोजी दिलेल्या निर्णयानुसार लोकसेवा आयोगाने सुधारित निकाल जाहीर केला. या निकालानुसार आयोगाने 11 सप्टेंबर 2019 रोजी नव्याने 118 उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली. त्याच वेळी आधीच्या निकालातील 118 उमेदवारांना यादीतून वगळण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या