स्वागत दिवाळी अंकांचे – मराठी विज्ञान परिषद पत्रिका

मराठी विज्ञान परिषद पत्रिका दिवाळी अंकात या वर्षी स्मरणरंजन (डॉ. बाळ पह्ंडके), आयुष्यमन भवः (डॉ. सुरेश भागवत), कृत्रिम बुद्धिमत्ता (वैशाली फाटक-काटकर), पासवर्ड (डॉ. विवेक पाटकर), वानर ते मानव (डॉ.रंजन गर्गे) आणि महाराष्ट्रातील कोरोना (प्रा. मिलिंद सोहोनी व आलख्या देशमुख) या लेखांचा समावेश आहे. या अंकाचे वैशिष्टय़ म्हणजे ’कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्ववभूमीवर ‘लस कशी तयार करतात?’ याविषयी डॉ. शेखर मांडे (महासंचालक, सीएसआयआर, नवी दिल्ली) यांच्या मुलाखतीवर आधारित डॉ. किशोर कुलकर्णी यांचा लेख तसेच आणि ’मुंबई मेट्रो’विषयी दिलीप हेर्लेकर यांचे माहितीपूर्ण लेख आहेत. त्याचबरोबर विज्ञान कथा आणि बालगोपाळांसाठी गंमत-जंमत इत्यादींचा समावेश आहे.

संपादक – शशिकांत धारणे, मूल्य – 150 रुपये.

दर्याचा राजा

यंदाही ‘दर्याचा राजा’ हा दिवाळी अंक कथा, काव्यांगण, लेखमाला, बालांगण, आरोग्य असे विविधांगी विषय घेऊन वाचकांच्या भेटीला आला आह़े यात केरळमधील थ्रिसूर जिह्यातील चक्वड गावच्या धाडसी रेखा कार्तिकेयन या सागरकन्येची यशोगाथा पंढरीनाथ तामोरे यांनी मांडली आह़े मधु मंगेश कर्णिक यांची सोनी कथा, प्रा माधवी कुंटे यांची घराचं घरपण, प्रा प्रतिभा सराफ यांची सुन्न, अशोक लोटणकर यांची प्रोजेक्ट, श्रीधर दीक्षित यांची दुसरे जग आणि मी, प्रमोद कांदळगावकर यांची संस्कार अशा विविध कथा या अंकात आहेत़ ड़ॉ नेताजी पाटील, ड़ॉ रविप्रकाश कुलकर्णी, डाॅ पांडुरंग भानुशाली, रत्नाकर पिळणकर, अशोक बेंडखळे, वीरेंद्र चित्रे, दिगंबर राऊत, श्रीपृष्ण पाटील आदींच्या लेखमाला यात प्रकाशित झाल्या आहेत़ ‘दर्याचा राजा’ या अंकात मत्स्य विभाग स्वतंत्र माडंण्यात आला आह़े ड़ॉ विनय देशमुख यांचा मत्स्य विभाग विद्यापीठ, ड़ॉ बाळासाहेब कुलकर्णी यांचा ब्ल्यू इकाॅनॉमी आणि महाराष्ट्र, हरेश्वर मर्दे यांचा महाराष्ट्र किनारपट्टीची मत्स्य संपदा, प्रा डाॅ सूर्यकांत येरागी यांचा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मिठबांव खाडीत आढळणारा खाडीकिनाऱयावरील सैनिकी खेकडा हे लेख वाचनीय आहेत.

संपादक – पंढरीनाथ तामोरे, किंमत – 75 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या