दिवाळी स्पेशल रेसिपी – चण्याच्या डाळीचे लाडू

86

साहित्य

२ वाटी चण्याची डाळ, १ वाटी साखर, १ ते सव्वा वाटी खवलेला नारळ, पाऊण वाटी तूप, ६-७ चमचे दूध, अर्धी वाटी सुकामेवा, १ चमचा वेलची पूड, १ चमचा केशरपूड.

कृती

चण्याची डाळ चार ते पाच तास भिजवून ठेवा. त्यानंतर डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एका कढईत तूप गरम करुन वाटलेली डाळ लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

डाळ परतल्यावर त्यात खवलेला नारळ व दूध घालून चांगले परतून घ्या.

एका पातेल्यात साखर घेऊन त्यात पाणी घालून साखरेचा पाक तयार करुन घ्या. त्यात सुका मेवा, वेलची पूड, केशरपूड घाला.

परतलेली डाळ पाकात घालून व्यवस्थित ढवळून घ्या. गार झाल्यावर लाडू बनवा. झटपट चण्याच्या डाळीचे लाडू तयार.

आपली प्रतिक्रिया द्या