दिवाळी स्पेशल रेसिपी – ड्रायफ्रुट करंजी

39

सारणासाठी साहित्य

४ कप बारीक रवा, अर्धा कप खवा, अर्धा चमचा वेलची पूड, चवीनुसार पिठीसाखर, ३ चमचे तूप, १ कप सुकामेवा (काजू, बदाम, चारोळी, खजूर, खारिक, किसलेले सुके खोबरे, खसखस)

पारीसाठी लागणारे साहित्य

२ कप मैदा, ३ चमचे पातळ तूप, सुकामेव्याचे सारण, दूध किंवा पीठ भिजवण्यापुरते

कृती

पॅनमध्ये २ चमचा तूप गरम करून त्यात सुकामेवा घालून ५ ते ८ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. तो परातीत काढून ठेवा. त्यानंतर तूप गरम करून त्यात रवा लालसर होईपर्यंत भाजावा. त्यानंतर रवा, खवा, सुकामेवा, खसखस, वेलची पूड, व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

मैदा, तूप आणि मीठ एकत्र करुन घ्या. त्यात दूध घालून कणिक मळून १५ मिनिटे ठेवावे.

कंरजीसाठी पुरी लाटून १ चमचा सुकामेव्याचे सारण भरून त्या व्यवस्थित कातण्यांनी कापून तेलात तळा. झटपट ड्रायफ्रुट कंरजी तयार…

आपली प्रतिक्रिया द्या