दिवाळी स्पेशल रेसिपी – पुदीना शेव

34

साहित्य

२ वाट्या तांदळाचे पीठ, १ पुदीन्याची जुडी, १ मोठा उकडलेला बटाटा, ८-९ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, मीठ चवीनुसार, अंदाजे बेसन पीठ, तळण्यासाठी तेल

कृती

पुदीना व हिरवी मिरची व्यवस्थित साफ करुन बारीक पेस्ट करुन घ्या. उकडलेला बटाटा किसून घ्या. पुदीना आणि हिरव्या मिरचीच्या पेस्टमध्ये तांदळाचे पीठ, किसलेला बटाटा, काळीमिरी पावडर, दालचिनी पावडर, चाट मसाला, चवीनुसार मीठ, आणि बेसन पीठ घाला.

२ चमचे तेलाचे मोहन घालून सैलसर मळून घ्या. शेव करण्याच्या पात्रातील बारीक जाळी वापरुन गरम तेलात शेव पाडून तळून घ्या. झटपट पुदीना शेव तयार.

आपली प्रतिक्रिया द्या