दिवाळी स्पेशल रेसिपी – गव्हाचे बिस्किट

87

सामना ऑनलाईन। मुंबई

गव्हाचे बिस्किट

साहित्य…दोन वाट्या गव्हाचे पीठ, दोन वाट्या मैदा, दोन चमचे दूध, दोन वाट्या लोणी (अमूल बटर) ,दीड वाटी दूध, २ चमचे तूप, ४ चमचे पीठी साखर, मीठ चवीनुसार, १ चमचा बेकींग सोडा, १ चमचा जीरे, टॉपिंगसाठी काजू/ बदाम

कृती.. सर्वप्रथम एका पसरट भांड्यात गव्हाचे पीठ व मैदा घ्या. त्यात लोणी टाका व हे मिश्रण मळताना त्यात साखर, मीठ, जीरं, बेकिंग सोडा टाका. नंतर त्यात थंड दूध टाकून मळून घ्या. (पीठ जास्त सैल मळू नये)

त्यानंतर ओव्हन १८० डिग्री सेंटीग्रेडवर सेट करुन घ्या. बेकिंग ट्रेला तुपाचा हात लावून त्यावर पीठाचे गोळे मध्यम गोल करुन ठेवा. त्यावर एक काजू/बदाम लावा. नंतर ओव्हनमध्ये बेक करा. झटपट गव्हाचे बिस्किट तयार.

आपली प्रतिक्रिया द्या