दिवाळी स्पेशल रेसिपी- गव्हाची चकली

343

सामना ऑनलाईन । मुंबई

कणीक किंवा गव्हाची चकली

साहित्य : ३ वाट्या गव्हाचे पीठ, २ चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, ४ चमचे तीळ, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.

कृती :
गव्हाचे पीठ फडक्यात पुरचुंडी बांधून कुकरमध्ये ठेवून तीन शिट्या काढून वाफवून घ्यावे.
ती कणीक गार झाल्यावर मोकळी करून त्यात वरील साहित्य घालावे व चांगले मळावे व चकल्या तळाव्यात.
आयत्या वेळेस करता येते. खायला कुरकुरीत होतात. त्यात घालायला तेल लागत नाही. स्वादिष्ट होतात व सर्वांना आवडतात.

आपली प्रतिक्रिया द्या