संग्रहालय बघायला कोणीही येत नाही; बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

प्रत्येक स्थळाच्या इतिहास आणि संस्कृतीला महत्त्वपूर्ण स्थान असते. अनेक प्राचीन वस्तूमधून इतिहास आणि संस्कृतीची माहिती मिळते. या प्राचीन ठेव्याचा साठा जपून त्याचे सर्वंधन आणि जतन करण्याचे महत्त्वाचे कार्य वस्तू संग्रहालय करत असतात. मात्र, संग्रहालय बघायला कोणीही येत नाही, असे सांगत मध्य प्रदेशातील खांडवा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी थेट संग्रहालयच बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या निर्णयावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संग्रहालयच बंद करण्यात आली तर पुढील पिढीला आपला इतिहास आणि संस्कृती कशी समजणार असा सवाल स्थानिकांनी केला आहे.

संग्रहालय बघायला कोणीही येत नाही. त्यामुळे खांडवाचे जिल्हाधिकारी अनय द्विवेदी यांनी थेट संग्रहालयच बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशानंतर पुरातत्त्व विभागाने संग्रहालयातील प्रतिमा आणि शिल्पे यांचा आढावा घेत आहेत. तसेच या दुर्मिळ प्रतिमा आणि शिल्पे ओमकारेश्वला स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशामुळे स्थानिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

संग्रहालय बघण्यासाठी आता कोणीही येत नाही, त्यामुळे आता त्यांची गरज नाही, असे द्विवेदी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. संग्रहालयाचे व्यवस्थापक शैलेश दशोरे यांना लॉकडाऊनच्या काळात 31 ऑगस्ट 2020 रोजी सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली. या संग्रहालयात भेट देण्यासाठी कोणीही येत नाही. त्यामुळे संग्रहालयाची गरज नाही. संग्रहालय नसल्याने व्यवस्थापकांचीही गरज नाही, असे सांगत त्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली आहे.

विविध ठिकाणी असलेल्या प्रतिमा आणि दुर्मिळ शिल्पे जमवून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे हाच संग्रहालयाचा उद्देश असल्याचे व्यवस्थापक शैलेश दशोरे यांनी सांगितले. या ठिकाणी दुर्मिळ 283 वस्तू आहेत. त्यात नवव्या शतकापासून ते सोळाव्या शतकातील अनेक वस्तूंचा समावेश आहे. त्यात द्वादश सूर्याचे दुर्मिळ शिल्प असल्याचे त्यांनी सांगितले. हे संग्रहालय 26 जानेवारी 1988 मध्ये स्थापन करण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिमा आणि शिल्पे यांचा आढावा घेण्याचे आणि त्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे संग्रहालयाचे सहायक प्रभारी कसरावद स्लतान सिंह आनंद यांनी सांगितले. या संग्रहालयात 10 व्या शतकापासून 18 व्या शतकापर्यंतच्या विविध प्रतिमा आणि शिल्पे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

एखाद्या शहराची ओळख बनवण्यासाठी अनेक वर्षे जातात. या शहराची ओळख या संग्रहालयामुळे आहे. ते संग्रहालय आता स्थलांतरीत करण्यात येत आहे. हा निर्णय खेदजनक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. आमच्या शहराची ओळख असलेले संग्रहालय बंद करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही, असेही स्थानिकांनी सांगितले. खांडव वनावरून या शहराला खांडवा हे नाव मिळाले आहे. इतिहासाचा हा दुर्मिळ ठेवा असल्याचे ते म्हणाले.

संग्रहालयात नवव्या शतकापासूनच्या दुर्मिळ प्रतिमा आहेत. 30 वर्षांपूर्वी एथक परिश्रमातून हे संग्रहालय उभारण्यात आले होते, असे भाजप प्रवक्ते सुनील जैन यांनी सांगितले. कोरोना महामारी आणि लॉडाऊनमुळे लोक येत नाहीत, असे कारण देत संग्रहालय बंद करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे जैन यांनी सांगितले. त्यामुळे संग्रहालय स्थलांतरीत करण्याऐवजी त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या