सगळे गाढवासारखे येऊन उभे राहिले, जिल्हाधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना सुनावले

1625
dm-jhansi

उत्तर प्रदेशच्या झाशी येथे पाहणी करता पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा पाणउतारा केला. बोलताना मात्र संतापाच्याभरात त्यांनी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गाढव’ म्हटले. त्यावेळचा व्हिडीओ सध्या उत्तर प्रदेशात व्हायरल झाला आहे.

जिल्हाधिकारी शिव सहाय अवस्थी जेव्हा जमिनीची पाहणी करण्यासाठी झाशी येथे पोहोचले तेव्हा तयारी पूर्ण झाली नव्हती. नगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ढिम्म कामबघून त्यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी तिथेच सगळ्यांना सुनवायला सुरुवात केली. बोलबोलत ते म्हणाले, ‘तुम्हाला कॉमनसेन्स नाही की मी जमीन बघण्यासाठी येत आहे, तर मार्किंग करायला हवे. तयारी ठेवावी. सगळेच्या सगळे गाढवासारखे येऊन उभे राहिले’.

आपली प्रतिक्रिया द्या