फुकट्यांचा बाजार उठणार, हे 10 सिनेमे-सिरीज मोफत पाहणाऱ्यांना फटका बसणार

मुंबईचे स्ट्रीट रॅपर डिव्हाइन  व नाझ यांच्या जीवनावर आधारित 'गली बॉय' हा चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट यंदा हिंदुस्थानकडून ऑस्करला गेला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 238.16 कोटींची कमाई केली.

चीनविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षादरम्यान देशात मोठ्या सायबर हल्ल्याचा धोका देखील वाढू लागला आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने सर्वांना जागरूक राहण्याचा सल्ला देतानाच मोफत वेबसाइट्स वापरू नयेत असे आवाहन केले आहे. विनामूल्य वेबसाइटवर चित्रपट किंवा वेबसिरीज पाहणे टाळणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. असे न केल्यास हॅकर आपला मोबाइल फोन किंवा कम्प्युटर हॅक करू शकतो.

महाराष्ट्र सायबर विभागाने 10 चित्रपट आणि वेब सिरीजची यादी प्रसिद्ध केली आहे. या सूचीत समाविष्ट सर्व चित्रपट आणि मालिका कोणत्याही विनामूल्य वेबसाइटवर पाहण्यास मनाई आहे. ‘मर्दानी २, झूटोपिया, जवानी जानेमन, लव्ह आजकाल, छपक, इनसेप्शन, बाहुबली, रजनीगंधा, गल्ली बॉय’ हे चित्रपट कोणत्याही मोफत वेबसाइटवर न पाहण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच वेबसिरीजमध्ये ‘दिल्ली क्राइम, ब्रूकलिन नाईन, पंचायत, अकुरी, फॉडा, गझल, मिंधंटर, नारकोझ, देवलोक, लॉस्ट’ यासारख्या वेबसिरीजचा समावेश आहे.

लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. डेटा नजर टाकली तर लॉकडाउनच्या काळात 512 सायबर प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. 273 लोकांना अटकही करण्यात आली आहे. यामध्ये अपमानास्पद व्हाट्सएप संदेश, फेसबुक पोस्ट्स, टिक टॉक व्हिडिओंचा समावेश आहे. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर केवळ काही पोस्ट आहेत. 108 वादग्रस्त पोस्ट काढण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या