हे करा!

  • सगळ्यांनाच उशिरापर्यंत झोपायला आवडते, पण या सवयीचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. सकाळी जास्त वेळ झोपण्याने वजन वाढते, नैराश्य येते, मधुमेहासारख्या आजारांची लक्षणे वाढतात. त्यामुळे ‘लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य, धनसंपदा लाभे’.
  • अलार्म वाजला की, दचकून पटकन उठण्याची सवय असते. तसे कधीही करू नका. झोपलेल्या अवस्थेत पटकन अंथरुणातून उठल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो, ग्लानी येऊ शकते. तसेच हृदयाचा झटकादेखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे उठताना सावकाश उठावे.
  • सकाळी उठल्यावर पाणी पिणे ही खूप चांगली सवय आहे. अनेक जण त्याचा कंटाळा करतात. ज्यांना पाणी पिण्याची सवय नाही अशांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. पाणी कमी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता होऊन थकवा जाणवतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर ग्लासभर पाणी प्यायला हवे.
  • व्यायाम ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करायला हवा. व्यायाम नियमित न केल्यास वजन वाढणे, ताकद कमी होऊन थकवा जाणवणे, रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार बळावतात.
  • ‘बेड टी’ ही अलीकडची फॅशन आहे. अनेकांना सकाळी उठल्या उठल्या हातात चहा लागतो, पण ही सवय चुकीची आहे. ‘बेड टी’ घेतल्याने पित्ताचा त्रास होतो, दात कमकुवत होतात, बद्धकोष्ठता आणि पित्ताचा त्रास वाढतो.
  • सकाळी उठल्यावर भरपेट नाश्ता करण्याची सवय चुकीची आहे. त्याच्यामुळे वजन वाढते, थकवा जाणवतो, सुस्तावल्यासारखे वाटते, रक्तदाब वाढतो अशा समस्या उद्भवतात.