तुमची रावणासारखी 100 तोंडे आहेत का?

गुजरात निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींची रावणासारखी 100 तोंडे आहेत का? मला कळत नाही, असे खरगे यांनी अहमदाबाद येथील निवडणूक रॅलीदरम्यान म्हटले आहे.

बेहरामपुरा येथील जाहीर सभेवेळी खरगे म्हणाले, ‘पंतप्रधान म्हणतात इतरत्र पाहू नका. केवळ मोदींना पाहून मतदान करा. किती वेळा तुमचा चेहरा पाहायचा? आम्ही महापालिका निवडणुकीत तुमचा चेहरा पाहिला, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येदेखील पाहिला. रावणासारखी तुमची 100 तोंडे आहेत का? हेच मला कळत नाही.’ यापूर्वी रविवारी सुरतमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी हे खोटारडय़ांचे सरदार आहेत, असे खरगे यांनी म्हटले होते.