अबब! किडनीतून काढले 552 खडे, ठाण्यातील रुग्णालयात शस्त्रक्रिया

6

सामना ऑनलाईन । ठाणे

ठाण्यामध्ये अतिशय दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. येथे 75 वर्षीय आजोबांच्या उजव्या किडनीतून थोडेथोडके नव्हे तर तब्बल 552 खडे काढण्यात आले आहे. एसआरव्ही ममता रुग्णालयात ही अवघड अशी शस्त्रक्रिया पार पडली.

डॉ. लोकेश सिन्हा यांनी याबाबत सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून या आजोबांना पोटदुखीची तक्रार होती. तपासणीमध्ये त्यांच्या उजव्या किडनीमध्ये 552 खडे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या खड्यांपैकी फक्त 2 खडे 2 एमएमचे होते, तर इतर अतिशय लहान परंतु त्रासदायक होते. लेसर शस्त्रक्रियेने दोन मोठे खडे काढण्यात आले आणि त्यानंतर छोटे खडे काढण्यात आले. अर्धा ते एक तास ही शस्त्रक्रिया चालली होती, असेही डॉक्टरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या