आत्याला भेटायला जाणे जीवावर बेतले

871

वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पवई आयआयटी मेन गेट परिसरात घडली. सचिन पुतळाजी भोसले असे मृताचे नाव आहे. अपघात प्रकरणी सिद्धार्थ सत्येंद्र चौधरीला पवई पोलिसांनी अटक केली. तो पवई येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर आहे.

मूळचा मुलुंडच्या गव्हाण पाडय़ातील रहिवासी असलेला सचिन हा आज सकाळी त्याच्या आत्याला भेटण्यासाठी मोटारसायकलने विलेपार्ले परिसरात जात होता. सकाळी पावणे आठच्या सुमारास सचिन हा आयआयटी मेन गेट येथून जात होता. तेव्हा रात्रपाळी करून घरी चाललेल्या सत्येंद्रच्या वाहनाने सचिनच्या मोटारसायकलला धडक दिली.

सत्येंद्रने सचिनला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले. अपघाताची माहिती कळताच पवई पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी सचिनच्या नातेवाईकाचा जबाब नोंदवून घेतला आहे. सत्येंद्रला पवई पोलिसांनी अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या