डॉक्टरांनो हस्ताक्षर सुधारा…! उडीसा उच्च न्यायालयाने टोचले डॉक्टरांचे कान

636

डॉक्टरांचे हस्ताक्षर हे नेहमीच न सुटणारे कोडं असते. डॉक्टरांच्या वेड्यावाकड्या हस्ताक्षरामुळे न्यायालयाला फटका बसला आहे. यामुळे उडिसा उच्च न्यायालयाने डॉक्टरांना हस्ताक्षर सुधारण्याची सूचना केली आहे. ही सूचना करताना त्यांनी राज्य सरकारला देखील हस्तक्षेप करण्याची सूचना केली आहे. राज्य सरकारने याप्रकरणी परिपत्रक काढून डॉक्टरांनी यापुढे वाचता येणारे आणि मोठे हस्ताक्षर काढावेत, अशी सूचना करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उडीसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के.पाणीग्रही यांनी हे आदेश एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिले. एका आरोपीने पत्नी आजारी असल्याकारणाने एक महिन्याचा जामिन मिळावा, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने आजारी पत्नीच्या आरोग्य चाचणी अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. हा अहवाल वाचताना न्यायालयाला अनेक अडचणी आल्याने न्यायालयाने डॉक्टरांचे कान टोचत हस्ताक्षर सुधारण्याची सूचना केली. मेडिकल आणि कायदेशीर या दोन्ही बाबींचे अहवाल देताना आणि औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शनवर देखील चांगले अक्षर असावेत, अशी सूचना यावेळी करण्यात आली आहे. यासाठी डॉक्टरांमध्ये जागृती येणे गरजेचे आहे. किंबहुना याकरिता डॉक्टर मंडळींनी देखील पुढे येण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने दिला नियमांचा आधार

यावेळी न्यायमूर्ती पाणिग्रही यांनी डॉक्टरांच्या न वाचता येणाऱ्या हस्ताक्षरासाठी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यामुळे रुग्णांच्या उपचारात देखील अडचणी येऊ शकतात. अनेकवेळा औषध देणाऱ्यांना देखील हे हस्ताक्षर समजत नाही. इतकेच कशाला तर अनेक डॉक्टरांना देखील त्यांनी लिहलेले हस्ताक्षर समजत नाही. त्यामुळे न्यायालयाने यावेळी डॉक्टरांना भारतीय चिकित्सा परिषद संशोधन अधिनियमांची आठवण डॉक्टरांना करून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या