रिलीवर येण्याअगोदरच डॉक्टर पसार, रुग्णांना सोडले वाऱ्यावर

12


सामना ऑनलाईन । लासलगाव

सहकारी वैद्यकीय अधिकारी कामावर हजर होण्याअगोदरच रुग्णांना वाऱ्यावर सोडून डॉक्टर रुग्णालयातून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे बाल रोग तज्ज्ञ आणि दुय्यम वैद्यकीय अधिकारी स्वप्नील पवार हे त्यांचे सहकारी डॉक्टर येण्याअगोदरच नाशिकला त्यांच्या घरी निघून गेल्याने रुग्णांनी संताप व्यक्त केला  आहे. लासलगाव प्रेस क्लबमधील पत्रकारांनी रुग्णालयात दिलेल्या अचानक भेटीतून हे प्रकरण उघडकीस आले.

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा व्हावी, ग्रामीण रुग्णालयांचा दर्जा अधिक चांगला व्हावा या उद्देशाने 2015 पासून राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या कायाकल्प या योजनेत लासलगाव ग्रामीण रुग्णालयाची निवड झाली होती. मात्र गेल्या चार महिन्यांपूर्वी या रुग्णालयात बाल रोग तज्ञांविरोधात रुग्णांच्या तक्रारी वाढल्या आहेत. बुधवारी कामकाजाची वेळ संपल्याने दुसरे वैद्यकीय अधिकारी येण्याअगोदरच डॉक्टर पवार रुगाणालयातून निघून गेले. त्यामुळे जवळपास पाऊण तास वैद्यकीय अधिकारी नसल्याचे दहा ते बारा रुग्ण उपचारासाठी ताटकळत बसलेले होते. कर्तव्यात हलगर्जीपणा करण्याऱ्या डॉक्टर विरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी  होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या