डॉ. श्वेता अकूलवार ‘शिवडी भूषण’, सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते गौरव

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभा आणि स्वर्गीय नयना अजय चौधरी स्तनकर्क संभावना निवारण ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘सन्मान स्त्री शक्तीचा, खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाला शिवडी विधानसभा क्षेत्रातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या डॉ. श्वेता अकूलवार यांना ‘शिवडी भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

कोरोना काळात शिवडी विधानसभेत वैद्यकीय क्षेत्रात अलौकिक कामगिरी केल्याबद्दल डॉ. अकूलवार यांना सन्मानित करण्यात आले. अभ्युदय नगर, काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात हा कार्यक्रम पार पडला. सुमारे पाच हजार महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. हा कार्यक्रम शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते, आमदार अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी स्व. नयना अजय चौधरी ट्रस्टचे सिद्धेश चौधरी, गौरी चौधरी, अश्विनी चौधरी-बांदिवडेकर, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, उपनेत्या-माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, सिनेअभिनेत्री शुभांगी लाटकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, विधानसभा संघटक सुधीर साळवी, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण, महिला विधानसभा संघटक लता रहाटे, उपविभाग संघटक रूपाली चांदे, श्वेता राणे, सहविधानसभा संघटक वैभवी चव्हाण, दिव्या घाडीगावकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, सिंधू मसुरकर, दत्ता पोंगडे, सचिन पडवळ, शाखाप्रमुख विजय इंदूलकर, अनिल गावकर, किरण तावडे, जयसिंग भोसले, हनुमंत हिंदोळे, महिला शाखा संघटक शारदा बाणे, भारती पेडणेकर, कांचन घाणेकर, अनुराधा इनामदार, म. शाखा समन्वयक दिव्या बडवे, कल्पना ओवळे, समिक्षा परळकर, सीमा संसारे, निलाक्षी चेंदवणकर, शैलजा पवार, आबोली खाडये, साधना राऊळ, माधुरी साळुंखे, कुसुम कोळी उपस्थित होते.