नायर रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या, तिघांविरोधात गुन्हा दाखल

13
death-suicide

सामना ऑनलाईन । मुंबई

नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी हिने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे.

जळगावची रहिवासी असलेली डॉ. पायल ही टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱया वर्गात शिकत होत्या. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉ. पायल हिने नायर रुग्णालयातील वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी डॉ. पायलचा मृतदेह जळगाव येथे नेण्यात आला. तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी केली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलिसांनीदेखील सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. काही साक्षीदारांचे जबाब नोंद करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या