रुग्णांना हनुमान चालीसा वाचण्याचा सल्ला देणारा डॉक्टर

439

सामना ऑनलाईन । जयपूर

तब्येत बिघडल्यावर सर्वात आधी आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर योग्य ते उपचार करुन आपल्याला लवकर बरे करेल हा त्यामागचा उद्देश्य असतो. पण जर डॉक्टरच देवावर विश्वास ठेवा असे सांगून तुम्हाला घरी पाठवत असेल तर रुग्णांना आता कोणाकडे जावे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याच प्रश्नाने सध्या राजस्थानमधील जनतेला हैराण केले आहे. कारण येथे एक डॉक्टर असून तो रुग्णांना औषध गोळ्यांबरोबर हनुमान चालीसा रोज वाचा असे प्रिस्क्रिपशनमध्येच लिहून देतो. एवढेच नाही तर लवकर बरे व्हायचे असेल तर रोज मंदिरात जाण्याचाही सल्ला देतोय. डॉक्टरच हे मजेशीर प्रिस्क्रिप्शन एका रुग्णाने सोशल साईटवर पोस्ट केलं आहे. या डॉक्टरच नाव दिनेश शर्मा (६९) असून ते भरतपूरचे आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात माहिती दिली आहे. शर्मा एका सरकारी रुग्णालयात वरिष्ठ ड़ॉक्टर होते. पण निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वताचा दवाखाना सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी व्यवसायाने मॅकनिक असलेला शेखर नावाचा तरुण पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेला. शेखरला तपासल्यानंतर डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिले. ते वाचताच शेखरला हसावं कि रडावं तेच कळेनास झालं. कारण त्यात सर्वात वर डॉक्टर फक्त उपचार करतात बरे मात्र देव करतो असे लिहिले होते. तसेच त्याखाली चार औषधांची नावे लिहिली होती. पाचवे औषध म्हणून रोज हनुमान चालीसा वाचावी. असे लिहिण्यात आले होते. तसेच रोज मंदिरात जावे आरती करावी .यामुळे मनःशांती मिळते व आजारही बरा होतो असेही लिहिले होते. हे अजब प्रिस्क्रिपशन बघून शेखरला आश्चर्य वाटलं. त्यानं ते प्रिस्क्रिप्शन सोशल साईटवर पोस्ट केलं. सध्या या प्रिस्क्रिप्शन सर्वत्र चर्चा आहे. एखाद्या डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनमध्ये हनुमान चालीसा वाचण्याचा सल्ला देणे किती योग्य यावरुन उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या