Viral : पीपीई किट नाही, डॉक्टरांनी केला ‘जुगाड’; नेटकरी म्हणतात हा तर ‘डॉक्टर ऑफ द इयर’

1055

कोरोनाव्हायरस देशात वेगाने पसरला आहे. वाढती प्रकरणे पाहून अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले. हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकीकडे, लोक घरी बसून कोरोनाव्हायरस पासून स्वतःचा बचाव करत आहेत, तर डॉक्टर रुग्णालयात उभे राहून याचा सामना करत आहेत. या व्हिडीओमध्ये, डॉक्टर पीपीई किट न घालता रुग्णावर उपचार करीत आहे, त्यासाठी त्यांनी एक युक्ती लढवली आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर जुगाड केला आहे. या जुगाडमुळे त्यांना ट्विटरवर नेटकऱ्यांनी ‘डॉक्टर ऑफ द इयर’ अशी पदवीच दिली आहे.

डॉक्टरांनी स्टेथोस्कोपची वायर लांब केली आणि रुग्णांना दूर ठेवून, तपासणी करून त्याच्या आजाराचे निदान करत आहे . हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही हसत असाल तरी हे प्रकरण गंभीर आहे. रुग्णालयात फ्रंटलाइन डॉक्टर रूग्ण जवळ राहूनच त्यांचे उपचार करत आहेत. तर त्याचवेळी काही जण क्लिनिकमध्ये पीपीई किटशिवाय असे उपचार करत आहेत. दक्षिणेकडील राज्यातील एका डॉक्टरचा व्हिडीओ व्हायराल झाला आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की डॉक्टर क्लिनिकमध्ये बरेचसे दूर बसले आहेत आणि रुग्णाला पलंगाच्या दुसर्‍या बाजूला ठेवलेले आहेत. ते त्याला स्टेथोस्कोप छातीवर ठेवण्यास सांगतात आणि लांबलचक वायरने त्याच्या हृदयाचे ठोके ऐकतात. मग रुग्ण दूरनच आपली समस्या सांगतो. लोकांनी ट्विटरवर या डॉक्टरला ‘डॉक्टर ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे.

https://twitter.com/avi_chandni/status/1287688163494752257?s=20

आपली प्रतिक्रिया द्या