सेल्फी घेताना तोल गेला; धरणाच्या पाण्यात डॉक्टरची पत्नी बुडाली

sunk_drawn

भोपाळच्या हलाली धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्याला सेल्फी काढण्याचा मोठा फटका बसला आहे. धरणाजवळ सेल्फी फोटो काढताना पत्नीचा तोल गेला आणि ती 10 ते 12 फूट खोल पाण्यात पडली.

भोपाळमध्ये कोलार येथे राहणारे डॉक्टर उत्कर्ष मिश्रा आपली पत्नी हिमानी मिश्रा सोबत भोपाळहून 40 किलोमीटर दूर हलाली धरणाच्या परिसरात गेले होते. रविवार सुट्टी असल्याने भोपाळहून अनेक पर्यटक या परिसरात येतात.

डॉ. मिश्रा म्हणाले की सेल्फी घेत असताना त्यांची पत्नी 10 ते 12 फूट खोल पाण्यात पडली आणि वाहून जाताना दिसली. काही वेळातच ती दिसेनाशी झाली.

घटनेची माहिती मिळताच मदतकार्य करण्यासाठी टीम दाखल झाली. रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. हा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले, मात्र अद्याप यश मिळालेले नाही. आजतकने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या