शेजारच्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध, मालकाने कुत्रीला रस्त्यावर सोडून दिले

625
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, तिरुअनंतपुरम

कुत्र्यांवर मनापासून प्रेम असणारी या जगामध्ये करोडो माणसे आहेत. अनेकजण कुत्र्याला किंवा कुत्रीला आपलं अपत्य समजायला लागतात आणि त्यावर तशी माया करतात. अशाच एका व्यक्तीने आपल्या कुत्रीचे शेजारच्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिला घराबाहेर हाकलून दिलं. केरळमधील तिरुअनंतपुरम शहरातील वॉलमार्केट गेट परिसरात ही कुत्री काही लोकांना आढळून आली होती. तिची नीट पाहणी केल्यानंतर आणि तिच्या गळ्यात अडकवलेली चिठ्ठी पाहिल्यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला आहे.

मालकाने रस्त्यावर सोडून दिल्याने ही कुत्री रस्त्यावर इकडेतिकडे फिरत होती. ही बाब काही लोकांनी पीपल फॉर अॅनिमल्स या प्राणीमित्र संघटनेच्या शमीम यांना कळवली. शमीम यांनी या कुत्रीची नीट पाहणी केल्यानंतर त्यांना तिच्या गळ्यामध्ये मालकाने अडकवलेली चिठ्ठी मिळाली. शमीम यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे की ” ही उत्तम ब्रीडची कुत्री आहे, ती जास्त खात नाही. तिचे शेजारच्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध असल्याने मी तिला रस्त्यावर सोडून दिलंय”. शमीम यांनी या कुत्रीला दत्तक घेतलं असून त्याच आता तिची सगळी देखभाल करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या