असर्जन येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांना चावा

29
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । नांदेड

महापालिकेच्या हद्दीत असलेल्या असर्जन येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने १४ व्यक्ती व ४ गायींना चावा घेतला. जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संतापलेल्या काही नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला मारून टाकले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतलेल्या चाव्यामुळे आनंदा पुयड या १३ वर्षीय मुलासह राम वैद्य, द्रोपदाबाई, श्रीराम राजेगोरे, रमेश पोलावार यांच्यासह अनेक जखमी झाले आहेत. कुत्र्याने मांडीला, हाताला, पोटाला चावा घेतल्यामुळे अनेक जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून, काहींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. यावेळी असर्जन येथील काही नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला शेवटी मारून टाकले. त्याने घातलेल्या हैदोसामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या