पिसाळलेला कुत्रा चावल्याने पंधरा जखमी

114

सामना ऑनलाईन, नाशिक

सिडकोतील उत्तमनगर व परिसरात सोमवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत लहान मुलांसह तब्बल पंधराजणांना जखमी केले. उपचारानंतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेने या कुत्र्यासह इतर आठ भटक्या कुत्र्यांना पकडले आहे.

सोमवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने उत्तमनगर, राजरत्ननगर व डिजीपीनगर भागात अक्षरशः धुमाकूळ घातला. उत्तमनगरला खोदकाम करणाऱ्या एका मजुराला चावा घेतला. त्यानंतर १७ महिन्यांच्या बालिकेला जखमी केले, नागरिकांनी कुत्र्याला पकडण्यासाठी लाठ्या-काठ्यांसह पाठलाग सुरु केला. त्यानंतर जास्तच धुमाकूळ घालत कुत्र्याने एकापाठोपाठ एक एकूण पंधरा जणांना जखमी केले. राजरत्ननगर येथील रोहीत पाटील (५), किशोर मोटे (३), हेमंत दोंदे (६), डीजीपीनगर येथील प्राजक्ता कांबळे (५), उत्तमनगर येथील साई पाटील (३), चेतना पाटील (१७ महिने), पवननगरचा ओम वाघ (४) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या